तू ही


वैभव जोशी

वैभव जोशी

किती काळ झुरशील? हरशील तू ही !
विसरतात सारे, विसरशील तू ही ॥

लवंडेल जेव्हां कुपी आसवांची
सुगंधाप्रमाणे पसरशील तू ही ॥

इथे आज मी पेरले श्वास माझे
उद्या ह्या ठिकाणी बहरशील तू ही ॥

जवळ जा जरा, स्पर्श कर आरशाला
चरे लागले की कचरशील तू ही ॥

अखेरीस मातीविना मोक्ष नाही
नभातून खाली उतरशील तू ही ॥

– वैभव जोशी

Advertisements

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s