नाही सोडणार साथ…!


Dilip Charthankar

 

नगं ईकू डोरल्याले
नगं पुरणं साजूक |
धनी काजळला रानी
लई येळ ही नाजूक ||

आली अवदसा देवा
भेगा फाकल्या रानात |
खचू नगं मह्या धन्या
नगं करपू मनात ||

येळ जाईल निघून
पुन्हा येईल ऊभारी |
पुढं फुललं शिवार
हटे अवदसा सारी ||

नगं फासाचा इच्यार
नगं करु तानातानी |
तुहं भरलय घर
गोकूळाच्या घरावाणी ||

चारा-पाण्यासाठी धन्या
नगं धूंडू तू छावणी |
तूह्यासंग उपासात
सोडू कशी मी दावणी ||

कशी चिल्या-पिल्यामंधी
मालकीन ईसावली |
नगं सोडू आधी-मधी
घरावर तू सावली ||

नगं झूलं मला नवी
नगं सिन्गार सणाला |
साथ राहणार तुह्या
मरोस्तोवर मनाला ||

आज सणाच्या वक्ताला
ठेव गळ्यावर हात |
म्हणं चिल्या-पिल्याम्होरं
नाही सोडणार साथ…!
नाही सोडणार साथ…!!

– दिलीप चारठाणकर, सेलू [परभणी]
मो…9175886240

Advertisements

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s