चर्च


धुक्यात हरवलेल्या संध्याकाळी
चर्चच्या घंटा वाजतात
हळुच भविष्याची कवाडे उलगडतात
खिन्नतेची बासरी वाजवत….

मनाची हुरहुर शिगेला पोहचते
पवित्र घंटानादात हरवते,
धुक्यात हरवलेले, चर्चही स्तब्ध,
जीवघेणी शांतता, विचारही नि:शब्द….

स्व:ताचा जीवघेणा शोध घेत,
धुके काळीज चिरुन शिरते
आत, आत, पुर्ण अंतरंगात,
अनामिक अस्वस्थता मेल्या मनात….

धुके क्रूसाला घट्ट आवळते
उपाशी विधवेच्या आवेगाने.
तरीही चर्चच्या घंटा निनादतात !
शरीर कोसळुन पडते, उन्मादी पश्चातापाने…

– ग्रेस

Advertisements

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s