तेंव्हा आपण भेटू


ढगांचे पुंजके जेंव्हा आकाशाच्या निळ्याभोर छताला लगडलेले असतील……
तेंव्हा आपण भेटू…….

मौनाच्या तलम अस्तराखाली जेंव्हा बेभान संवाद वाहत असतील…….
तेंव्हा आपण भेटू……

या राकट देहावर जेंव्हा तुझ्या पदरातून चांदणं
पाझरत असेल……
तेव्हा आपण भेटू…

कुणाच्यातरी तोंडून एकमेकांच नाव ऐकल्यावर उगाच बावरल्यासारखं होईल…….
श्वास आखुड होतील…..
तेंव्हा आपण भेटू……

चारचौघांत एकमेकांपासून अगदी गुन्हेगारासारखं तोंड लपवावसं वाटेल !!
तेंव्हा आपण भेटू…….

जेंव्हा “झोप का येत नाही?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल!
तेंव्हा आपण भेटू…….

मनात येईल तेंव्हा नकोच…..

– उनाड

Advertisements

One thought on “तेंव्हा आपण भेटू

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s