एवढ मात्र खर


हिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं ,
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं

हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून,
तुझ्या माझ्या सारया जागा पाहिल्या पुन्हा फिरून ,
विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून
तू होतीस ,नव्हतीस, पण हिचं हसणं होतं ,
सोबत माझ्या हिचं असणं तुझं नसणं होत ,
खर सांगू ? हिच्या डोळ्यात माझंच फसणं होतं ,
हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं ,
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं .

असे तसे कसेतरी जगतात काहीजण
तसं हिला जरा जरा कळत माझं मन ,
संध्याकाळी गप्प होतो हे हि हिला कळलं ,
तुझी बाजू घेऊन हिने खूप मला छळल
खरच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही ,
कुणास ठाऊक का मी विचारला हि नाही
आई म्हणते सोडून द्याव सगळ भलं बुरं ,
मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर

तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो
कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो ,
तुझी आठवण येते आहे हिला आधी कळत ,
माझ्या आधी डोळ्यांमधून हिच्या पाणी गळत ,
ओंठ ठेवते गालांवर समजून घेते खूप,
भळभळनार्या जखमेवरच हे असं साजूक तूप ,
जगण्यासाठी आता मला एवढाच सुख पुरं ,
मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर……..

 • सौमित्र

आभार – Kishore Kadam (सौमित्र)

Advertisements

2 thoughts on “एवढ मात्र खर

  • चल रे बंड्या माळाला
   घेऊन सगळ्या जनवाराला
   बांध भाकर काठीला , चल रे बंड्या माळाला .

   मग जावू चिखलातून
   काटा घुसला चाप्प्लातून
   पाणी आले डोळ्यातून
   सुट्टी आहे आज शाळेला
   चल रे बंड्या माळाला .

   जाऊ मग लेहरावर
   खाऊ मिरची भाकर
   आली मोठी ढेकर
   झोप लागली गवतावर .

   मग पोहू विहिरीत
   सगळ्या माश्याला लाजवीत
   मुटका – सुळूंग मारून
   अंगाड गेले वाकुन .
   गाय गेली धानाला
   जा वळती करायला
   लाव स्टंप मातीत
   बॉल गेला केकताडित .

   दिवस लागला मावळायला
   न्हे जनवारे पान्याला
   जनवारे घालू पोहणीला
   लई आलंय पाणी तळ्याला .

   दिवस गेला मावळून
   लई उशीर झाला खेळून
   जाऊ घरी धार काढून
   भूक लागली भाकर बघून .
   रात्री माघारी यायचंय रानात
   पार्टी आहे माझ्या मनात
   लय मज्या येते खळ्याच्या पार्टीत
   नाही येत कुठल्या हाटेलात .
   – विष्णू लाकाळ (9405090003)

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s