शब्दांशी खेळता खेळता


शब्दांशी खेळता खेळता कवितेचा जन्म झाला
का, कश्या, कुणास ठाऊक प्रसव-वेदना कुठून आल्या

कवितेला वाढवता वाढवता एक मात्र लक्षात आले
शब्दांनीच शब्दांसाठी कवितेला ओटीत घातले ,

बालहट्ट संपले सारे कविता आता प्रौढ झाली
कवितेशी खेळता खेळता शब्दानाही धार आली

वास्तवाचे चटके सोसून कविता जेव्हा घायाळ झाली
शब्दांचीच ताकद तिला परत परत सावरून गेली ,

रसिक माय-बाप भेटीस तुमच्या लेकीस आता पाठवत आहे
चुकले-माकले माफ करा शब्दांचीच दाद तिला हवी आहे

शब्दच तिचे सखे सोबती शब्दच तिचे जीवन आहे
शब्दांशी ऋणानुबंध जपण्यासाठी कौतुकाची एक थाप हवी आहे .

– अंजली राणे वाडे : ११/०५/१३.वसई .

Advertisements

2 thoughts on “शब्दांशी खेळता खेळता

  1. शब्दांशी खेळता खेळता..खूप छान कविता शब्दांशी खेळतां खेळता वास्तव चांगलेच रेखाटलेत … कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे.

    shrikant v patil

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s