स्वरताज चांदण्यांचा झिरपून कंठी येता


स्वरताज चांदण्यांचा झिरपून कंठी येता
हे शब्दरूप तुझे गाते जरी मी आता
संगीत जीवनाचे लिहिले जरी तू सारे
अधरातुनी परी या छेडीत सूर ते आले,

आलाप भावनांचा शब्दातूनी कळाला
षडजातूनी मनीचा चितचोर हा मिळाला
परसात मारव्याचा वसंत कसा मग फुलला
बिलगून भैरवीला नभी तारका ही निजल्या,

क्षितिजावरी उषेची घुमू लागली आरोही
थंडावले मृदुंग गात्रे शिथिल झाली
मैफील जीवनाची रंगात तुझ्या या रंगली
घेवून तान तुझ्या मिठीत शांत ती झाली.

– अंजली राणे वाडे : वसई .

Advertisements