श्राद्ध


मोगरा फुलला २०११ दिवाळी अंकात प्रकाशित झालेली माझी कविता पुन्हा सादर.

घास ठेवताना म्हंटले काव काव
कावळ्याने सुनावले, गरजेपुरता देता भाव
तिरस्कार वरीसभर, उकीर्ड्यावरी ताव
अपायकारक आरोग्यास, तुम्हालाही ठाव

युनियन मध्ये आमचा, पास झाला ठराव
पितृ पक्षाचा पिरीयड, दुप्पट बढाव
पुण्याई साठी तुमच्या, बोलवी काव काव
मुले मागतात पिझ्झा- चायनीज, ठेवा जरा राव

जाता अनेक ठिकाणी, पोटात होई गडबड
आमंत्रणे घेता घेता, मिळत नसते सवड
विचार करा मागण्यांचा, व्यर्थ नसे बडबड
स्फूर्ती स्थान अण्णा, मागणी आमची सडेतोड

म्हणाल आता, बरेच कि हो फोरवर्ड
पुढील पिढी आमची, रिटर्न OAXFORD
पुढील खेपेस चार्जेस, वी accept क्रेडीट कार्ड
गंभीर जखमी कावळ्यांसाठी, उभारतोय आय सी यु वार्ड

चालू होतेय काव काव काल सेंटर
लावा आगाऊ, टोल फ्री नंबर
देताच आम्ही दगा, फासा डांबर
स्पेशल व्हाईट कलरला, पडती शंभर

वाईट वाटून ,घेवू नका रे बाबा
गेल्यावरच आठवतात, कसे तुम्हा आजोबा
जिवंतपणी माणसाला , हवे असते प्रेम
व्यर्थ सारी मेहनत अन ती सोनेरी फ्रेम

कवी – गजानन लोखंडे

Advertisements

2 thoughts on “श्राद्ध

  1. खरंच किती वाईट परिस्थिती आहे जिवंत नात्यांना आपण मातून टाकतो.जेव्हा एखादी व्यक्ती जवळ असते तेव्हा तिला काडीचाही भाव दिला जात नाही आणि ती व्यक्ती मेल्यावर ती किती कष्टाळू प्रेमळ होती याचे दाखले दिले जातात तेच जर ती जिवंत असताना २ शब्द बोलून कौतुक कधी केलंय का आठवून पहावे.
    आजची वास्तव परिस्थिती काय आहे हेही या कवितेतून जाणवते.

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s