आई गेल्यानंतरचे वडील


आई गेल्यानंतरचे वडील
अबोल झाले,

पूर्वीसारखेच स्वयंपाकघरातल्या कोपर्‍यात
देवांना न्हावू-जेवू घालतात
पण आरती करताना
त्यांचा हात थरथरतो,
आईने लावलेल्या बदामाच्या झाडाभोवती
कचरा साफ़ करण्याच्या निमित्ताने रेंगाळतात,
ओट्यावर बसतात
आभाळाकडे पहातात
जुन्या पोथ्या काढून
पुन्हा बांधून ठेवतात,
वर्तमानपत्र डोळ्यांजवळ धरून वाचतात,
जेवणानंतर उदबत्तीच्या काडीने
खुप वेळ दात कोरतात
मळकट आंब्याच्या कोयीतून
हिरवी काडी वर यावी
तशी जुनाट आठवण सांगतात कधीतरी,

अंथरुणावर पडल्यावरही
बराच वेळ जागे असतात,
बोटाच्या पेरावर काही तरी मोजतात
हे नाम्स्मरण तर नक्कीच नव्हे
कारण ती शांतता
तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडत नसते

मग ते काय मोजत असतील ?

– दासू वैद्य (तूर्तास)

Image Courtesy – BG Limaye

Advertisements

10 thoughts on “आई गेल्यानंतरचे वडील

  1. ह्या साठी वर्षातून दोन वेळा महिन्याभर बायकोला माहेरी पाठवयाचे, ती जायचा अगोदर सराव करून घाययाच.नंतर उगीचच काहीतरी मोजत बसून काय फायदा.

  2. खूप अस्वस्थ वाटले वाचताना म्हणून स्त्री मग किती कोणीही असो आई ,बहिण वा बायको तिचा आदर करा ती नसली तर तिचे महत्त्व कळते पण उपयोग नसतो .

  3. Navara aso va Bayko, Ekmekanche sathidar asatat. Konihi aadhi gele tari mage rahanaryala jagane mushkilch hote. Te aapan badalu shakat nahi, pan sharirane ti vyakti jawal nasali tari manane tar ti kayam aaplya jawal rahu shakate na….. mag radat basanyapeksha ti vyakti mazya sobatch ahe ase samajun jagayche, mhanaje tya vyaktilahi anandch hoil.

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s