मनी लागते रुजावयाला


मनी लागते रुजावयाला( पार्श्वभूमी )

माझी ही अगदी अलीकडील पावसावरील दुसरी रचना. या रचनेला अगदी छोटी पार्श्वभूमी आहे. ती सर्वांशी शेअर करावी वाटली म्हणून हे लिखाण!
कालच फेसबुकवर अनुराधा वर्तकचे अगदी छोटे लिखाण वाचण्यात आले. मुंबईत पडत असलेल्या पावसाबद्दल लिहिले होते
ते वाचताना मला कांही ओळी सुचल्या. त्या मी अनुराधाला दिलेल्या प्रतिसादात लिहिल्या होत्या. त्या ओळी इतक्या सहज सुचल्या आणी अनुराधाला आवडल्या पण. नंतर या ओळी डोक्यात घोंघावू लागल्या. संध्याकाळ पर्यंत रचना तयार पण झाली. अनुराधाचे लिखाण या रचनेसाठी अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्यामुळे तिचे आभार.
मी सुरुवातीला ही कविता प्रेयसीचे उत्कट भाव दाखवणारी लिहावी असे ठरवले आणी लिहीत गेलो. कवितेचा पोत सुध्दा प्रणयाचा असावा असे मनात आले. पण शेवटचे कडवे कसे आणी कुठून आले हे कळलेच नाही आणी या कडव्यामुळे कवितेचा एकूण मूडच पलटला. मी ट्रान्स सारखा मोठा शब्द वगैर वापरणार नाही कारण मी कांही कुणी मोठा कवी नाही. पण मला अगदी प्रथम कळले की कवीला आपण कविता लिहितो असे वाटत असले तरीही असे चक्रावून टाकणारे आणी न ठरवलेले लिखाण होते कधी कधी. हा अनुभव शेअर करण्यासाठी हा सारा प्रपंच.


बीज तुझ्या रे आठवणींचे
मनी लागले रुजावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला

ओल्या ओल्या मनास वाटे
सरून जावा अता दुरावा
तुझ्या संगती जगता जगता
क्षणात माझा ग्रिष्म विरावा
मिठीत तुझिया, रोमांचाने
अधीर झाले सजावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला

ऋतू बदलती क्रमास अपुल्या
तू येण्याचे निमित्त साधुन
वारा घाली शीळ अशी की
कोकिळकंठी भासे ती धुन
बारा महिने श्रावण देइन
मनात ये तू रहावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला

कडाडणार्‍या विजेप्रमाणे
तुझे क्षणातच येणे जाणे
सुरू व्हायच्या अधीच माझे
कसे संपते जीवन गाणे?
एक क्षणाच्या लखलखण्याने
प्रीत थरथरे फुलावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला

रंगामध्ये असे रंगले
वेगवेगळे कधी न दिसले
तो सार्‍या विश्वाचा होता
कळूनही तिज नव्हते वळले
मुग्ध राधिका कृष्णासाठी
मनी लागली झुरावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला

श्रावण वांझोटा गेल्यावर
मनास माझ्या मीच सांगते
पुढील वर्षी येइल तो हे
गोड मधाचे बोट लावते
भ्रामक आशा मनी बाळगत
शिकले आहे जगावयाला
पहिल्या वहिल्या शिडकाव्याने
मस्त निघाले भिजावयाला

– निशिकांत देशपांडे मो.क्र. 98907 99023
E Mail– nishides1944@yahoo.com
निशि .दे .काव्य .

Image Courtesy – निशि .दे .काव्य .

Advertisements

One thought on “मनी लागते रुजावयाला

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s