किती ? – एक जनरल छापील फॉर्म


तू आवडतोस/तेस
तू खूप आवडतोस/तेस
तू प्रचंड आवडतोस/तेस
तू सॉलीड आवडतोस/तेस
तू अफाट आवडतोस/तेस
तुझ्यावाचून जगणे नाही इतका/की आवडतोस/तेस
श्वास घेणं शक्य नाही इतका/की आवडतोस/तेस
तू नसशील तर नसेन मी ही इतका/की आवडतोस/तेस

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

तो/ती खपून आता वर्ष होईल अवघं दीड
पण अजूनही आवडतंच त्याला/तिला
वाडीलालचं चॉकलेट आईस्क्रीम,
ब्राऊन शेडेड शर्ट/साड्या,
सनसेट, भीमसेन, पिकासो, परफ्युम्स…
आणिक हो !
आताशा ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस कलीगची कंपनीही
एक कप कॉफीसाठी (?)…
’तो’/’ती’ असली म्हणजे मन थोडं हलकं होतं…यू नोऽऽ

’तो’/’ती’ आवडतो/ते
’तो’/’ती’ खूप आवडतो/ते
’तो’/’ती’ चिकार आवडतो/ते
…तुझ्यावाचून जगणे नाही…
…श्वास घेणं शक्य नाही…
…तू नसशील तर नसेन मी ही…
……………..वगैरे…..

– संदीप खरे

Advertisements

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s