मराठी शायरी


वेदना भरपुर इथे अन,
अमाप दुःखे रडण्यासाठी
सहजच मिळतील हजार जागा
एकांतामधे कुढण्यासाठी
तरीही आहे आज इथे मी
मैफ़िलीस या हसविण्यासाठी

—————————

एवढ्यात तिरडी उचलु नका थोडं अजुन हसु द्या मला
लगेच चिता पेटवु नका थोडं अजुन जगु द्या मलाती येईलच इतक्यात जरा एकटयाला पडु देत मला
माझ्यासाठी तिला रडताना डोळे भरुन पाहु द्या मला
—————————

पचवुन पाप सारे आम्ही पवित्र असतो
यादीत भेकडांच्या आम्ही पुढेच असतो
गणतीत मानवांच्या आम्ही कधीच नसतो
वस्तीत माणसांच्या आम्ही पशुच असतो
————————–

शौर्य कोणा काय सांगु लढलो कधीच नाही
जगण्यातील मौज सांगु ऐसे कधी जगलोच नाहीऐकण्यात जन्म गेला स्वतःस आम्ही ऐकलेच नाही
चोर आम्ही कोणा म्हणावे परके कुणी दिसलेच नाही
———————————–

कोण तो मृत्युच का
आम्हास आला न्यावया
ठेवलाहे प्राण सज्ज
आम्ही तयाला द्यावया
चल निघुया लोक जमतिल
अश्रु कोरडे ढाळावया
बागेतील अमुच्या फ़ुले तोडतील
प्रेतावर अमुच्या वहावया
——————–

पाहिले हजार सोहळे
ऐसा न सोहळा पाहिला
लाथाडले आजन्म ज्यांनी
प्रेतावर माझ्या एक अश्रु ढाळिला
—————————

मरणास कोण डरतो
आहेच तेही यायचे
स्वतःस मी बजावतो
तेव्हा तरी हसायचे
—————————-

जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही,
एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही |
——————————-

जन्मभर अश्रुस माझ्या शिकविलेस नाना बहाणे,
सोंग पण फ़सव्या जीण्याचे, शेवटी शिकलोच नाही
——————————–

मृत्यु म्हणाला येऊ का ?
मी म्हटलं आत्ताच ये
कायम एकटाच जगलो
तु तरी सोबतीला ये
———————————-

ही व्यथा माझीच आहे अन दुःखही माझेच आहे
ओघळले गालावरती रक्त ते माझेच आहे
शब्दही माझेच अन वेदनाही माझीच आहे
पिळवटुन ह्रुदय आली शायरी ती माझीच आहे
———————————-

बेभान वा-यावर जरा ढळला पदर तिचा
पाहिले आम्ही अन आम्ही बेहोष झालो
ऐसे नव्हे की आम्हा दिसलेच काही
पाहुन बेहोषी तिची आम्ही बेहोष झालो
———————————-

प्यायलो थोडीच आम्ही बहकलो भरपुर होतो
वाटले बेभान नाचु पण रडलो मनसोक्त होतो
वहावलो भरपुर तरीही उरलो कोरडेच होतो
जगलो कळपात आम्ही राहिलो एकटेच होतो
–*————————

मरणास थांब सांगु आहोत आम्ही ऐसे बिलंदर
करण्यासही काही ना उरले जगलोत आम्ही इतके कलंदरआम्ही उधळले आयुष्य अवघे मग आजन्म अश्रु ढाळले
दुःख इतकेच की उधळले सारे जयांवर त्यांना कधी ना उमजले
——————————–

चाखली मद्ये अनेक, पण प्यायलो डोळ्यांतुनी
ती नशा न्यारीच होती
मग धावलो देवाकडे, ती नशा उतरु नये
मागणी इतकीच होती

-अनामिक

Advertisements

48 thoughts on “मराठी शायरी

 1. शब्द अंतरीचे असतात, मात्र दोष जिभेला मिळतात.
  मन स्वतःचे असते, मात्र झुरावे दुसऱ्यासाठी लागते.
  ठेच पायाला लागते,
  मात्र वेदना मनाला होतात, डोळ्यांना रडावे लागते.
  हेच खरे मैत्रीचे नाते असते.

  • ~~ मैत्री ~~
   भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
   की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
   मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
   ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ”

  • शब्द अंतरीचे असतात, मात्र दोष जिभेला मिळतात.
   मन स्वतःचे असते, मात्र झुरावे दुसऱ्यासाठी लागते.
   ठेच पायाला लागते,
   मात्र वेदना मनाला होतात, डोळ्यांना रडावे लागते.
   हेच खरे मैत्रीचे नाते अस

  • शब्द अंतरीचे असतात, मात्र दोष जिभेला मिळतात.
   मन स्वतःचे असते, मात्र झुरावे दुसऱ्यासाठी लागते.
   ठेच पायाला लागते,
   मात्र वेदना मनाला होतात, डोळ्यांना रडावे लागते.
   हेच खरे मैत्रीचे नाते असते.

 2. ~~ मैत्री ~~
  भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
  की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
  मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
  ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ”

 3. ~~ मैत्री ~~
  भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
  की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
  मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
  ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ”

 4. प्यायलो थोडीच आम्ही बहकलो भरपुर होतो
  वाटले बेभान नाचु पण रडलो मनसोक्त होतो
  वहावलो भरपुर तरीही उरलो कोरडेच होतो
  जगलो कळपात आम्ही राहिलो एकटेच होतो

 5. ~~ मैत्री ~~
  भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट,
  की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट,
  मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट कारण
  ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक “रेशिमगाठ

 6. बेभान बरसणारा पाऊस नाही मागत तुझ्याकडे, एखादा ओघळणारा थेंब तरी दे…
  सुसाट वाहणारा वारा नाही मागत तुझ्याकडे, मंद झुळुक तरी दे…
  मूठीएवढे ह्रदय नाही मागत तुझ्याकडे, दोस्तीसाठी चुकणारा ह्रदयाचा ठोका तरी दे…
  अन् काहीच जमणार नसेल तुला,तर आयुष्यभराची दोस्ती तरी दे…!

 7. काही आठवणी विसरता येत नाहीत,
  काही नाती तोडता येत नाहीत., मानस दुरावली तरी मन नाही दुरावत,
  चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

 8. तु म्हणजे एक स्वप्न,भल्या पहाटे पडणारे,
  तरीही खोटे ठरणारे,मनात दडुन ठेवलेले,
  कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे

 9. कुणाचेच नसतात हक्क कुणावरपण तरीही डोळे भरतातच ना?
  “अपेक्षाच करू नये अश्या”पण अपेक्षा तरीही उरताताच ना?

 10. डोळ्यांतुन ओघळलेला थेंबमाझ्यावरच्या प्रेमाची साक्ष होता
  तो रुसलेला ओला रुमाल..पाऊले मागे फिरताना हसला होता

 11. श्वासाला तुझ्या होते,ते उसास्यांचे भास नव्हते,
  तुझ्या श्वासात मिसळलेले,सख्या ते माझे श्वास होते

 12. वेडं हे मन माझे तुझी वाट पाहणं सोडत नाही
  तू परत कधीच येणार नाही कदाचित त्याच्या मनालाही हे पटत नाही

 13. !!! काही दोन पावलेच चालतात, आणि कायमची लक्षात राहतात,
  काही साथ देण्याची हमी देऊन, गर्दीत हरवून जातात……. !!! 9anesh!…

 14. देईन तुला सुख सारे नाही याची देत हमी
  पण प्रेमात नाही राहणार कधी कोणतीही कमी
  तुझी साथ नशिबात असो किंवा नसो
  पण पाहवेना मला तुझ्या नयनात नमी
  तुझ्या खुशीतच माझी ख़ुशी

 15. वाटतं तुझ्या आयुष्याच्या वाटेवर सर्वत्र पसरली मखमल असावी
  चुकून एखादा काटा कधी रुतला तरी वेदना फुलाहून कोमल असावी

 16. पिंगबॅक मराठी शायरी | Marathi Search Results

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.