घेता


देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !

– विंदा करंदीकर

Advertisements

2 thoughts on “घेता

  1. मराठी फारशी कळत नाही तरीपण “घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ” हे वाक्य आणि ३ अर्थ : (१) जो सदैव देतच गेला त्याचे हात त्याच्या म्हातारपणी आपल्या हातात घ्यावे (२) जो देणारा आहे त्याचे हात आपण स्वीकारले तर आपण सुद्धा भविष्यात काहीतरी देऊ शकु आणि (३) गब्बर म्हणतो : ये हात मुझे दे दे ठाकूर ! …अशी ही काही माणसे !!!

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s