” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम


” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम

मी अभिजित दाते यांच्या बर्‍याच कविता ब्लॉगवर टाकल्यात. मी त्याच्या कविता / गझलांचा चाहता झालोय.

त्याचा आता पहिला वहिला अल्ब्म नुकताच येउ घातलाय. त्याबद्दल. ( आभार – मानबिंदू आणि अभिजित दाते )

*****************

” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम

“हळवेपण” हा काव्या क्रिएशन्स प्रस्तुत करत असलेला सुधांशु जोशी आणि अभिजीत दाते या संगीतकार-कवी जोडीचा पहिलाच अल्बम.

“हळवेपण” बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, हा मानवी भावभावनांचा कॅलिडोस्कोप आहे, ज्यात डोकावल्यावर प्रेम, विरह, आर्तता, हतबलता आणि आशावादाची नक्षी दिसून येईल. नावाप्रमाणेच विविध भावनांचं हळवं रूप या अल्बममधल्या सगळ्याच गाण्यांमध्ये दिसतं. तिच्या आठवणीत रमतानाचं ‘तुझी आठवण बरी’, ‘प्रेम’ आणि ‘पाऊस’ यात अद्वैत व्यक्त करणारं ‘पाऊस’, आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना अलगद ओठावर येणारं ‘गेली जिंदगी’ आणि जीवनातल्या सार्‍या भावनांचा कोलाज असलेली ‘कितीसा’ ही गझल, या सार्‍यातच अभिजीतचे शब्द आणि सुधांशुचे स्वर हातात हात घालून सामोरे येतात.
सुप्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरे यांनी हळवेपण च्या प्रकाशनावेळी दिलेली मनसोक्त दाद.

प्रथमच संगीतकार म्हणून पदार्पण करणार्‍या सुधांशुच्या चालीत एक नावीन्य जाणवतं. त्याने संगीतबद्ध केलेलं, लाईट रॉक प्रकारातलं ‘बरेच काही’, ‘बोसा बीट्स’ वर बेतलेलं ६०-७० च्या दशकाची आठवण करून देणारं ‘बेत आहे’ आणि मेलडीत चिंब भिजवून टाकेल असं ‘पावसाने’ ही गाणी आपली वेगळी छाप सोडून जातात. ‘गेली जिंदगी’ गझलेचा शास्त्रीय साज आणि ‘कितीसा’ या गैरमुसलसल गझलेचा फ्युजन बाज त्यातल्या शब्दांना योग्य न्याय देऊन जातो.

या अल्बमचं प्रकाशन सुप्रसिद्ध कवी, गीतकार संदीप खरे यांच्या शुभहस्ते नुकतच पार पडलं. त्यांनीही या अल्बमला अतिशय दिलखुलास अशी दाद दिली. सुधांशु, अभिजीत या जोडीबद्दल बोलताना संदीप खरे म्हणाले “फार कमी वेळा असं होतं की समोरची व्यक्ती भेटल्यावर ती आपल्यासारखीच, समधर्मीय आहे असं जाणवतं. या दोघांच्या बाबतीत मला असं जाणवलं म्हणूनच मी आज प्रकाशनासाठी इथे आलो.”
***************

Advertisements

One thought on “” हळवेपण ” – अभिजित दाते यांचा पहिला अल्बम

आपल्या येण्याची जाणीव आम्हाला प्रतिक्रियांद्वारे करून द्या. आपली प्रतिक्रिया इथे जरूर नोंदवा.

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s