भूमी राज्य करणेस सोयीची ठरेल.’

भ्रमण करता करता

राजज्योतिषी

एका विशिष्ट

भूमीशी येउन थबकले

जिथे

सर्प आणि

मुंगुस

सहकार्याने

सावज पकडताना दिसले.

राजज्योतीषी

सुलतानाला म्हणाला

‘ही भूमी राज्य करणेस सोयीची ठरेल.’

- वाटेवरच्या कविता, अशोक नायगांवकर

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr

सत्यजित रे, थापा आणि शंकर्‍याचे बाबा

सत्यजित रे, थापा

आणि शंकर्‍याचे बाबा, एकदम गेल्याचं कळलं

आपल्याला असं नेहमीच कुणीकुणी गेल्याचं कळतं

आणि मग नेमकं काय बोलायचं, नेमकं काय वाटतं,

काहीच कळत नाही

काहीतरी वाटत मात्र रहातं

तसा, रे मला खुप आवडायचा

गरिबांचं, दु:खाचं किती छान चित्र काढायचा ! Read more of this post

अनुमान

एकटाच मी काहीबाही बरळत बसलो!
उदास झालो कधी; कधी मी खिदळत बसलो!

कसले कसले अर्थ चिकटले या शब्दांना…!
घासघासले एकेकाला…विसळत बसलो! Read more of this post

इस बार नही

इस बार नही – By Prasoon Joshi (after the mumbai terror attacks)

काल परवा सहज कुठलेसे awards बघताना प्रसून जोशी यांचं वाक्य ऐकलं “……thanks for giving award to poetry based lyrics “(…..अशाच अर्थाचं काहीसं). तेव्हा वाटल यांच्या कविता वाचायला हव्यात. प्रसून जोशी यांची मला सापडलेली हि पहिलीच कविता…

इस बार जब वो छोटी सी बच्ची मेरे पास अपनी खरोच ले कर आएगी
मैं उसे फूं-फूं कर नही बहलाऊगा
पनपने दूंगा उसकी टीस को
इस बार नही

इस बार जब मैं चेहरों पर दर्द लिखा देखूंगा Read more of this post

” शाळा ” – तुमची आमची.

” शाळा ” – तुमची आमची.

” शाळा ” – तुमची आमची.

काल “शाळा” सिनेमा पाहिला. अगदी ओपनींग क्रेडिट्स पासूनच सिनेमा वेगळा असल्याची चाहूल देतो. दिलिप प्रभावळकर, संतोष जुवेकर, जितेंद्र जोशी अशी तगडी मंडळी असली तरिही सिनेमा बालकलाकारांभोवाती जास्त फिरतो. अंशुमन जोशी आणि मुळात गायिका असलेली केतकी माटेगावकर हिने छान काम केलयं.

गाणी नसली तरिही पार्श्वसंगीत छान जमलंय. गोष्ट ओळ्खीचीच तरीहि वेगळी वाटते. चित्रपट शांत पण सुंदर आहे. चित्रपटाचा शेवट हूरहूर लावुन जातो.

एकुणच… या शाळेत नक्की जा. आपल्या शाळेतल्या मित्रांबरोबर गेलात तर अजुन मजा येइल.

http://shalacinema.com

अपडेट्स मिळवण्यासाठी हा URL वरील URL bar मध्ये paste करा http://feedburner.google.com/fb/a/mailverify?uri=wordpress/fQXr